Education Mahrashtra

जालन्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

Share

मुंबई,२८ मे :

जालन्यात जिल्हापरिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केले आहे. पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे मात्र, नियमानुसार आधी बदली, प्रमोशन आणि समायोजन करणे गरजेचं असते.

मात्र तसं न करता जिल्हा परिषदेने पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला. याला विरोध करत शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.

जोपर्यंत मुख्याधिकारी आधी जिल्हातंर्गत बदली, प्रमोशन आणि समायोजन असा शासनाने ठरवून दिलेल्या क्रमानुसार पत्र काढत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असच सुरु राहणार असल्याचे यावेळी आंदोलक शिक्षकांनी सांगितले आहे.

Related posts

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात रस्ते कामांच्या प्रश्नासाठी माजी आमदार अनिल गोटेंचे देहत्याग आंदोलन

editor

मालसाणे शिवारात एस.टी. बसची कंटेनरला धडक; पंधरा जण जखमी

editor

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाप्रसंगी उत्साहाने स्वागत

editor

Leave a Comment