अमरावती,१० जून :
शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम तोंडावर आला आहे. त्यातच कृषी सेवा केंद्र संचालकांकडून बियाण्यांचा व खतांचा काळाबाजार सुरू असून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत आज अमरावतित युवा सेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात धडक दिली आहे.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना चांगलेच धारेवर धरले आहे. जिल्ह्यात सर्वत्र अजित १५५ या कपाशीच्या बियाण्यांला मोठी मागणी आहे. इतर बियाण्यांचीही अशाच पद्धतीने कृषी सेवा केंद्रात चढ्या भावाने विक्री केली जात आहे. कृषी सेवा केंद्रातील फलकांवर बियाणे, खते यांचा साठा नियमित लिहल्या जात नाही. खते, बियाणे उपलब्ध असतानाही कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना त्याची विक्री केली जात नाही आहे. तर दुकानांबाहेरील दलालांमार्फत जास्त पैसे घेऊन या बियाण्यांची शेतकऱ्यांना विक्री केली जात आहे.
कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची कृषी सेवा केंद्र संचालकांशी मिलीभगत असून कृषी विभागाच्या सहकाऱ्यानेच शेतकऱ्यांनाची पिळवणूक केली जात असल्याचे युवा सेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे