politics

वाढवण बंदर प्रकल्प भाजपा सरकार जनतेवर जबरदस्तीने लादत आहे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप….!

Share

मुंबई प्रतिनिधी ,दि २० जून :

पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असतानाही भाजपाच्या तानाशाही सरकारने गुजरातच्या भल्यासाठी बंदर बांधण्याचा चंगच बांधलेला असून स्थानिकांचा विरोध डावलून भाजपा सरकार जबरदस्तीने वाढवण बंदर बांधून स्थानिकांना देशोधडीला लावत असल्याचा गंभीर व थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे बोलताना केला.

पालघर जिल्हा निसर्ग संपन्न असून मच्छिमारी मोठ्या प्रमाणात केली जाते.परंतु वाढवण बंदरामुळे पर्यावरणाची हानी तर मोठ्या प्रमाणावर होणारच आहे पण मासेमारीचा व्यवसायही धोक्यात येऊन लाखो लोकांच्या रोजगारावर गदा येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कोकण पदवीधर मतदारसंघातील मविआचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पालघरमधील कार्यकर्ता व पदवीधर मेळाव्यात बोलताना पटोले पुढे म्हणाले की,भाजपा सरकारने २०१४ पासून राज्यात नोकर भरती केली नाही.नोकरभरती केली तर पेपरफुटी होते आणि परिक्षा रद्द मग पुन्हा परीक्षा आणि त्यासाठी पुन्हा फी भरा असे दुष्टचक्र सुरु आहे. त्यातच पोलीस भरती पावसाळ्यात घेतली जात असून या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी जोर धरत आहे पण भाजपा सरकार ऐकत नाही.पदवीधर असूनही नोकरी नसल्याने मोलमजुरी करण्याची वेळ पदवीधरांवर आली आहे.वेळेवर परीक्षा घेतल्या जात नसल्याने वयोमर्यादा संपते व तरुणांचे स्वप्न भंगते. त्यामुळे आता राज्यातील सुशिक्षित मतदार हाही भाजपाच्या तानाशाही सरकारच्या विरोधात आहे हे दाखवण्याची ही संधी असल्याचे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले.

पदवीधर निवडणुकीत सुशिक्षित लोक मतदान करत असतात.आजपर्यंत भाजपा अशा मतदारसंघावर कब्जा करत असत.पण आता चित्र बदलले असून नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येत होता, पण महाविकास आघाडीने ती जागा लढवली व जिंकली. त्यानंतर अमरावतीची जागाही जिंकली.आता विधान परिषदेच्या चार मतदारसंघात निवडणुकीत होत असून या चारही निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत असेही आवाहन पटोले यांनी केले.

यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, राहुल गांधी यांची पदयात्रा काढून देशातील चित्र बदलवले त्यामुळे काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले, राज्यातही महाविकास आघाडीला घवघवशीत यश मिळाले. मागील तीन वर्षात झालेल्या विधान परिषद निवडणुका, पुण्यातील कसब्याची पोटनिवडणुक व आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सातत्याने यश मिळाले त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही मोठे योगदान आहे.विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातूनही मविआचे उमेदवार रमेश कीर यांनाचं बहुमताने विजयी करा असे आवाहन खान यांनी केले.

या मेळाव्याला प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,कोकण पदवीधर मतदारसंघाचे मविआचे उमेदवार रमेश कीर, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह,पालघर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राकेश पाटील, विकास गोरे यांच्यासह महाविकास आघाडीतल सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

editor

बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवले ! राज्य निवडणूक आयोगाचा निर्णयराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा

editor

किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरे यांच्यावर धुळ्यात टीका

editor

Leave a Comment