Civics

खालापूर तालुक्यातील चौक येथील पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाजवळील रस्त्याची दयनीय अवस्था

Share

रायगड,२७ जून :

खालापूर तालुक्यातील चौक येथील पनवेल कर्जत रेल्वे मार्गाजवळील पुलाखालील मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे या मार्गवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची बिकट अशी अवस्था झाली आहे.

त्यातच चिखल मातीचा रस्ता झाल्याने कसरत करीत वाहचालकांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावरून दररोज अनेक लोकं ये जा करत असतात.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. पावसामुळे या मार्गावरील खड्डे आणखी मोठे झाले आहेत. या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक वाहनचालक व ग्रमास्थांनी केली आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

Related posts

दुष्काळी उपाययोजनांसाठी काँग्रेसचे राज्यपालांना साकडे ; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी

editor

बचत गटांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उभारणार उमेद मॉल !

editor

राज्य शासनाच्या प्रचार प्रसार समन्वयकपदी प्रा.डॅा.ज्योती वाघमारे यांची नियुक्ती

editor

Leave a Comment