Share
मुंबई प्रतिनिधि (सुचिता भैरे),१४ जून :
२९ मे रोजी वर्सोवा येथे सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या टनेलचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून त्यामध्ये जेसीबी चालक सह जेसीबी मातीच्या ढिकाऱ्याखाली दबला होता. या घटनेला १७ दिवस उलटून गेलेले असतानाही सरकारने यावर काहीही निर्णय घेतला नव्हता परंतु आज या दुर्घटनेत मृत पावलेल्या चालकाच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
दरम्यान अपघातातील राकेश यादव यांचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याने आर्मी कोस्ट गार्ड यासारख्या एजन्सींकडून तातडीने शोध मोहीम सुरू करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या घटनेची चौकशी व्हिजेटीआयचे प्रोफेसर बंबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.