politics

महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात ३० टक्के कमिशन ! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने

Share

मुंबई, दि. ११ प्रतिनिधी :

महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असून सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही.स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही.याचा निषेध म्हणून गुरुवारी पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला.विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत ‘भाजप हटवा, भ्रष्टाचार मिटवा’,’महायुती सरकारचे एकच मिशन,प्रत्येक कंत्राटात ३० टक्के कमिशन’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनेही केली.

शेतकऱ्यांना आणले रस्त्यावर भ्रष्टाचारी सत्तेच्या गादीवर,महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात ३० टक्के कमिशन,भ्रष्टाचारी झाले सत्ताधारी, कष्टकरी झाले भिकारी,योजनेत सरकार घेते टक्केवारी वर सांगतात आम्ही नाही भ्रष्टाचारी,भाजप हटवा भ्रष्टाचार मिटवा, सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांना हवी दलालांची मैत्री,अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत महायुती सरकारच्या काळात राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार विरोधात निदर्शन केले.कमिशन एजंट सरकार हाय हाय, टक्केवारी सरकार हाय हाय,खोके सरकार हाय हाय,शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो,अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडी नेत्यांनीही आक्रमक होत पायऱ्यांवर आंदोलन केले.

Related posts

विधानसभेसाठी भाजपकडून प्रभारींची नियुक्ती ; भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी

editor

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान मजबुत करणारे नेते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

editor

संजय राऊत यांनी रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले – बावनकुळे

editor

Leave a Comment