Uncategorized

हिंदुस्थानी संगीताचा स्वर प्रभाकर दिगंतात विसावला ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली

Share

मुंबई, दि. 13 फेब्रुवारी :

हिंदुस्थानी संगीतातील स्वर भास्कर दिगंतात विसावला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना अर्पण केली आहे.

धारदार, पल्लेदार स्वरांनी भारती संगीत क्षेत्राचे स्वर नभांगण उजळून टाकणारा किमयागार म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर अजरामर राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, पंडित कारेकर यांचा स्वर म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील अपूर्वा ठेवा आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेतील शिष्योत्तम म्हणता येईल, अशा पंडित कारेकर यांची सांगितीक कारकिर्द राहीली. त्यांनी आपल्या गुरूंजनांचा नाव लौकिकही जपला आणि सातासमुद्रापार नेला. पंडितजींच्या खास शैलीतील स्वरांनीच कित्येकांच्या दैनंदिनीची सुरवात होत असे. त्यांच्या स्वरांनी अभंग, भजन, भावगीत ऐकणाऱ्यांची पिढी तयार केली. दर्दी रसिकांची दाद मिळविण्याबरोबरच, श्रोतृवृंद वर्ग निर्माण करण्याचे कार्यच पंडितजीच्या स्वरांनी केले. नव्या पिढीने संगीत क्षेत्रात यावे यासाठी त्यांनी या क्षेत्रात प्रयोगशीलता राबविली. पंडितजींच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तीन पिढ्यांना जोडणारा मार्गदर्शक दिगंतात विसावला. ते स्वरांनी अनंतकाळ आपल्या सोबतच राहतीलच, पण त्यांचे निधन ही भारतीय संगीत क्षेत्राची भरून निघणार नाही अशी हानी आहे. पंडितजीच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही कारेकर कुटुंबिय आणि पंडितजीच्या रसिक चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related posts

युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकून आंदोलन

editor

लातूर जिल्ह्यासाठी 20 हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीला मंजुरी

editor

कॉपर केबलचे आमिष दाखवून मुंबईच्या पार्टीला घातला गंडा; लुटीतील तिघे १२ तासांतच पोलिसांच्या ताब्यात

editor

Leave a Comment