Education

अकरावीसाठी १ लाख ६० हजार जागांसाठी अर्जच नाहीत

Share

मुंबई,दि २१ जून :

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर मुंबई महानगर क्षेत्रातील नामांकित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तीन लाख ९९ हजार २३५ जागांपैकी दोन लाख ३८ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. यामध्ये तब्बल एक लाख ६० हजार ३०३ जागा रिक्त राहणार आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख ३८ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केला आहे. यात ६० ते ७९.९९ टक्के गुण मिळवलेले एक लाख १२ हजार ८७३ विद्यार्थी आहेत, तर ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ हजार ७६ एवढी असल्याने यावेळी अनेक नामांकित आणि इतर महाविद्यालयांत पहिल्या फेरीदरम्यान प्रवेशासाठी मोठी चुरस निर्माण होईल, तर दुसरीकडे रिक्त जागांचेही मोठे आव्हान दिसून येणार आहे. या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा वाणिज्य शाखेकडे आहे, तर त्या सर्वाधिक कल हा वाणिज्य शाखेकडे आहे, तर त्या खालोखाल विज्ञान शाखेकडे, सर्वात कमी कल हा कला शाखेकडे दिसून आला आहे.

कलाच्या ३२ हजार जागा रिक्त अकरावी प्रवेश प्रक्रियेत मागील काही वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात केवळ २० हजार विद्यार्थ्यांनीच कला शाखेसाठी अर्ज केले आहेत. कला शाखेतील एकूण उपलब्ध जागा ५२ हजार ३१० असून यंदा अर्ज कमी आल्याने तब्बल ३२ हजार ३१० जागा रिक्त राहणार आहेत.

वाणिज्यच्या सर्वाधिक जागा रिक्त मुंबई महानगर क्षेत्रात वाणिज्य शाखेसाठी एकूण दोन लाख आठ हजार ५२० जागा उपलब्ध आहेत, मात्र यासाठी केवळ एक लाख २३ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून उर्वरित ८४ हजार ७४६ जागा रिक्त राहणार आहेत, तर विज्ञान शाखेच्या एक लाख ३३ हजार ४४० जागांसाठी ९३ हजार ८९५ अर्ज आल्याने यातील ३९ हजार ५४५ जागा पहिल्याच फेरीत रिक्त राहणार आहेत.’

Related posts

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा

editor

जालन्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

editor

बुलढाण्याचा १८ महिन्यांचा अंशिक ठरला आयबीआर अचीव्हर; अंशिकच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

editor

Leave a Comment