ठाणे,२७ जून :
अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला आरोपी अनिल कुमार प्रजापती याला आज सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पथकाला याच गुन्ह्यात उत्तरप्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुनकुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे.
ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तीन आरोपींची अंगझडती घेतली असता १७ लाख २० हजार रुपयांचा १ किलो ७२० ग्राम चरस हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने त्याच्या नवीमुंबई येथील आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर घरातून १ लाख ७० हजाराचा १७० ग्राम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांती नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एनडीपीएस गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकाने १८ लाख ९० हजाराचा अंमली पदार्थ चरस हा हस्तगत करीत एकूण तीन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.