Civics Mahrashtra

वेसावे गावातील तीन अनधिकृत इमारती निष्कासित : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामाविरोधात कठोर कारवाई सुरू

Share

मुंबई ,१२ जून :

वेसावे (वर्सोवा) येथे अनधिकृत बांधकामाविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कठोर कारवाई सुरू आहे. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती महानगरपालिकेचे इमारत व कारखाने विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पथकाच्या वतीने दिनांक ११ जून २०२४ निष्कासित करण्यात आल्या

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. वेसावे येथील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यादृष्टीने कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात दिनांक ३ आणि ४ जून २०२४ रोजी वेसावे येथे दलदलीचा भाग आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र (कोस्टल रेग्यूलेशन झोन) या ठिकाणची काही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली होती. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या तीन इमारती उपायुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार यांच्या नियंत्रणाखाली आणि सहाय्यक आयुक्त (के पश्चिम विभाग) डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने इमारत व कारखाने विभागाकडून दिनांक ११जून२०२४ निष्कासित करण्यात आल्या. यापैकी पहिल्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर एक मजला, दुसऱया इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले तर तिसऱया इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले असे स्वरुप होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १० अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, दोन इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

      

Related posts

बाणगंगा तलावाच्या परिसरात नुकसान करणाऱया कंत्राटदाराविरोधात

editor

सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्याने एसटीचा अपघात

editor

अर्जुनी मोरगाव विधानसभेत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

editor

Leave a Comment