Civics Mahrashtra

राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करणे आणि महिलांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार – सुनिल तटकरे

Share

अधिवेशन संपताच राज्यव्यापी दौरा करणार…

जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कालचे दादांवरील भाषण आम्ही सतत मांडत आलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारे…

मुंबई दि. ११ जून –

राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करणे आणि महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आज बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील महिला जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची आणि अल्पसंख्याक सेल व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आणि महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयात पार पडली.

राज्यसरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी, उन्नतीसाठी ज्या – ज्या योजना अपेक्षित आहेत त्याचा आढावा दोन – चार दिवसात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव मागणी केली जाणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचीही बैठक झाली. प्रवक्ते हे पक्षाची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत असतात. लोकसभा निवडणुक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सखोल चर्चा झाली. त्याचबरोबर सोशल मीडियाची बैठक घेतली. त्यानंतर अल्पसंख्याक सेलच्या विभागाचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यांचेही मत समजून घेतले. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन अनेक वर्षे वाटचाल करत आलो त्याच विचारधारेवर वाटचाल करत असतानाच अल्पसंख्याक समाजाच्या भावना समजून घेतल्या. पुढच्या आठवड्यातही आमच्या पक्षाचे जे सेल आहेत त्यांच्याही बैठका घेणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान अधिवेशन संपल्यावर राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करणार असल्याची घोषणाही सुनिल तटकरे यांनी यावेळी केली.

चार वेळा पवारसाहेबांनी अजितदादांना वेडं बनवलं आणि पाचव्या वेळी सोडून दिलं. म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती याविषयावर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पवारसाहेबांसमोर जाहीर भाषण करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला.

Related posts

‘विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे: प्रशासनाचे आवाहन

editor

आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त प्रचंड गर्दी आटेक्यात आणण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई

editor

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य राज्याचा कारभार करण्यासाठी मार्गदर्शक…!

editor

Leave a Comment