Environment Global national

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिन

Share

मुंबई, ५ जून :

५ जून हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात आहे.मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कल्याण डोंबिवली तसेच शिरपूर शहरात वृक्षारोपण करून हा दिवस साजरा करण्यात आला तर बोरवली येथे शाळकरी मुले आणि आरपीएफ च्या जवानांनी पर्यावरणाबाबत जनजागृती केली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून रिंग रोडच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केडीएमसी आयुक्त इंदू राणी जाखड यांच्यासह पालिका अधिकरी कर्मचाऱयानी या मोहिमेत सहभाग घेतला होता .यावेळी आपटा, कांचन, निम, बहावा, आवळा, करंज, गुलमाहर, सोनमोहर, बेल  प्रजातीची झाडे लावण्यात आली आहे. यावेळी महापालिका आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात ट्री गार्डन ही संकल्पना राबवण्यात येणार असून महापालिकेची मालमत्ता महसूल विभागाची जागा, वनक्षेत्र खाजगी जागांवर देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्ताने नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा आवाहन केलं आहे.

तसेच शिरपूर शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शहर पोलीस स्टेशन,आणि महिला दक्षता समितीच्या संयुक्तमाने पोलीस वसाहत परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. ५ जून हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि शहर पोलीस स्टेशन, आणि महिला दक्षता समितीचे अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते शहरातील पोलीस वसाहत परिसरात मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

तर बोरिवलीत जागतिक पर्यावरण दिननिमित्ताने शाळकरी मुले आणि रेल्वे जीआरपी आणि आरपीएफच्या जवानांसोबत पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक३ वर ही मोहीम राबविण्यात आली.दरम्यान झाडे आणि वनस्पतींचे महत्त्व सांगितले,की जर आपल्या आयुष्यात झाडे नसतील तर तापमान ५० च्या पुढे जात राहील.

तसेच मुंबई महानगरपालिकेचे महापालिका उपायुक्त मिनेश पिंपळे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेकडून आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत तसेच सगळी कामे पर्यावरण पूरक करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts

Final Lap: Key Battlegrounds and Campaign Blitzes in Indian Elections

editor

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन

editor

कोल्हापुरात मुसळधार पाऊस,पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

editor

Leave a Comment