बुलढाणा ,२५ मे :
बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री लख्ख चंद्र प्रकाशात निसर्गाचा अनुभव घेता आला. त्यावेळी वन्य प्राण्यांची गणना वन्यजीव विभागाकडून करण्यात आली.. निसर्ग अनुभव करताना ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वन परिक्षेत्रात १४ मचणीवरून ६०३ वन्य प्राणी आढळून आले आहेत. यामध्ये विशेषतः २० बिबटे व ३३ अस्वले सह इतर वन्य प्राण्यांचा समावेश असल्याची माहिती बुलढाण्यातील आरएफओ चेतन राठोड व खामगावतील आरएफओ दिपेश लोखंडे यांनी दिली आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्खप्रकाशात वन्यजीवांचे नोंद करण्यात येत असते. वन्य प्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभाग घेता येतो. यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात १४ मचानावर बसून निसर्गप्रेमींना प्राणी गणनेचा आनंद घेता आला. यावेळी एका निसर्गप्रेमी सोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता. वन्यजीवच्या हालचालीवर लक्ष ठेवून प्राण्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये बिबट, अस्वल, रानडुक्कर, सायाळसह इतर वन्य प्राणी आढळून आले. निसर्ग अनुभव कार्यक्रमात कार्यक्रम राबविण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ दीपेश लोखंडे, व आरएफओ विशेष सेवा पी.बी. पाटील आणि वन्यजीव विभागाचे इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता..
ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव करताना यावर्षी ६०३ वन्य प्राणी आढळले. यामध्ये बिबट – २०, अस्वल -३३, रानडुक्कर -१७७, सायाळ-८, ससा-१५, तडस-५, भेडकी-७, निलगाय-१६५, मोर लांडोर-१४०, चींकारा-९, हरीण -२१, खवले मांजर -२ व रान मांजर -१ असे ६०३ वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे..