Civics

ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी दोन टोगो व्हॅन शहराच्या सेवेत दाखल

Share

ठाणे दि।१८ जून :

ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी यासाठी जागेवरच सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वीच शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे.

ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवण्यात आला आहे. कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल व कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही हा यामागचा उद्देश आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल. यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येते आहे. या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा केला जातो. त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते. प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन आल्या आहेत.

भविष्यात ओवळा माजिवडा मतदारसंघासाठी ५० व्हॅन देणार आहेत. जेणेकरून कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

कचऱ्याचे खतात रूपांतर झाल्याने मतदारसंघातील जी उद्याने आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडे आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लॅण्डस्केप करण्यात आले आहेत, तिथे खताचा पर्यावरणसुलभ वापर करता येईल. तसंच मोठ्या मध्यवर्ती भागामध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता. त्यामधून ह्या दोन टोगो व्हॅन घेतल्या आहेत. महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून, राज्यात असा प्रकल्प पहिल्यादांच होतो आहे, अशी माहीती आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.

Related posts

विधानसभेच्या तयारीसाठी भाजपची शुक्रवारी बैठक : देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

editor

हरितक्रांतीचे जनक, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या : नाना पटोले

editor

अनेक वीज कनेक्शन आता बिल भरा एकाच क्लिकवर नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

editor

Leave a Comment