केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी साधला विद्यार्थ्याशी दिलखुलास संवाद
मुंबई दि. १२ जुलै :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान कधी ही बदलु शकत नाही.मोदी हे संविधानाला माथा टेकणारे,संविधानाला माननारे आणि संविधान मजबुत करणारे प्रधानमंत्री आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.पुण्यातील एस.पी कॉलेज येथे विद्यार्थ्याशी रामदास आठवले यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता.यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना रामदास आठवले यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन एस.पी कॉलेज आणि रिपब्लिकन पक्षाच्या श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी समाज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार ऍड .एल.टी सावंत स्वागतअध्यक्ष म्हणुन शिक्षण प्रसारमंडळीचे चेअरमन एस के जैन उपस्थित होते.यावेळी तिसऱ्यांदा केंदिय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सतिष केदारे,रिपाइं महिला आघाडीच्या संघमित्रा गायकवाड,कुमार ढवळे, विष्णू भोसले आदिंनी केले.या कार्यक्रमात एस.पी कॉलेज चे प्राचार्य सुनिल गायकवाड,रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,परशुराम वाडेकर.शैलेश चव्हाण,श्रीकांत कदम,संजय सोनावणे,बाळासाहेब जानराव,कुमार व्हावळकर, डॉ.सिध्दार्थ धेंडे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळी ही शिक्षण संस्था सन १८८८ साली स्थापन झाली आहे.एस.पी कॉलेज चे दहा हजार विद्यार्थी आहेत.महाराष्ट्रातील अग्रगन्य हि शिक्षण संस्था आहे.या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस के जैन यांना शिक्षण क्षेत्रातील योगदाना बदल पिपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
.यावेळी विद्यार्थांनी रिपब्लिकन पक्ष इतर राजकिय पक्षां पेक्षा वेगळा कसा याबाबत प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला रामदास आठवले यांनी उत्कृष्ठ उत्तर दिले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आहे.संविधानीक मुल्यांचे उद्दिष्ट्य बाळगुन धर्मनिरपेक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्ष काम करित आहे.सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणार रिपब्लिकन पक्ष आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा विद्यार्थ्यांशी झालेला संवाद सर्व उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. अशी माहिती या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या रिपाइं च्या महिला नेत्या संघमित्राताई गायकवाड यांनी दिली.