Mahrashtra politics

‘महायुतीचे काळे कारनामे’ पुस्तिकेचे अनावरणराज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलाय – जयंत पाटील

Share

मुंबई दि.१९ प्रतिनिधी :

राज्यातील महायुतीचं सरकार हे भेदरलेले आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणाऱ्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांची मुंबईमध्ये आज महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. ‘महायुतीचे काळे कारनामे’, असे नावं दिलेल्या पत्रकार परिषदेतून जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनी केले.

यावेळी राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकारमधील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारी घटनांवर भाष्य करत जयंत पाटील यांनी सरकारवर पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल केला आहे.जयंत पाटील म्हणाले की, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे कँपन लॉन्च करत आहोत. त्यात लोक त्यांची मतं मांडू शकतात. त्याचा जाहीरनामा बनवताना विचार केला जाईल. १९ जुलैपासून १५ ऑगस्टपर्यंत हे कँपेन लागू राहिल. महायुतीचे काळे कारनामे नावानं पुस्तक बनवून महायुतीविरोधात एल्गार करणार आहोत, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी काळे फुगे फोडून महायुती सरकारचा निषेधही करण्यात आला.

राज्यामध्ये गेल्या ५ महिन्यांत तब्बल १०७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात एक नंबरवर पोहोचला आहे. तर गुन्हेगारीच्या बाबतीतही हे महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे. तसेच, एकीकडे महागाई वाढत चालली असताना शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत, हे डबल नाहीतर ट्रबल इंजीनच सरकार आहे. असेही जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, हे डबल नाही ट्रबल इंजिन सरकार आहे. भ्रष्टाचाऱ्यांचा एकचनारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा असे चित्र राज्यात आहे. राज्यात २५ नेते असे आहेत जे आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये गेले अन् कारवाई बंद झाली. ताजे उदाहरण रविंद्र वायकर आहेत, म्हणजे तिकडं गेली की चौकशी काही होत नाही. आता खेडकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला तर त्या सुटू शकतात असे माझ्या वाचण्यात आलं असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, भ्रष्टाचारात बेसुमार वाढ झाली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे. राज्यातून प्रकल्प गुजरातला गेले तरी मूग गिळून गप्प बसणारं महाराष्ट्रातील सरकार आहे. या सरकारच्या काळात पेपरफुटीचे घोटाळे प्रचंड वाढले. पाच वर्षात साडे ११ लाख विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला. नवे उद्योग आणता आले नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

या सरकारने गुन्हेगारीतही महाराष्ट्राला एक नंबरवर नेऊन ठेवले आहे. डेटानुसार महाराष्ट्र दंगली घडवण्यात प्रथम क्रमांकावर आहे. मर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बलात्कारामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. हे आकडे पाहिल्यावर समजेल या लोकांनी कुठे महाराष्ट्र नेऊन ठेवला आहे. हिट अँड रन प्रकरणात सर्व श्रीमंतांची मुले होती. श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचे काम या सरकारने केले. आमचा कोणताही कार्यकर्ता किंवा आमदार रात्रभर कुणासाठी पोलीस ठाण्यात बसत नाही. आमचा कोणताही कार्यकर्ता कुणाचे रक्त बदलण्याचा फंदात पडत नाही. ते सत्ताधारी आहेत. त्यांच्या जवळ सर्व श्रीमंत लोके आहेत त्यांना सोडवण्यात ते व्यस्त असतात. असे जयंत पाटील म्हणाले.

Related posts

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार : मोदी सरकार मुस्लिमविरोधी नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

editor

मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले ६०१ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

editor

Controversy Over Pro-tem Speaker Selection in 18th Lok Sabha

editor

Leave a Comment