Share
जळगाव, दि.25 ऑक्टोबर :
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवसेना (उबाठा) नेत्या वैशाली सुर्यवंशी यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आज शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅलीने शहराचे लक्ष वेधले होते.
भव्य रॅली पाचोरा शहरातून तहसील कार्यालयात आली यावेळी शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवासेनेचे सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.
यावेळी वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले की विजय हा माझा 100% होणार आहे. या ठिकाणी सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आलेले होते एकही गद्दार या ठिकाणी नव्हता त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.