Civics

अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याबाबत भाजप महिला मोर्चाचे ठाणे महानगरपालिकेबाहेर तीव्र आंदोलन

Share

ठाणे,१२ जून :

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यासाठी निदर्शने करण्यात आली आहेत. सदर आशयाचे निवेदन ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले आहे व येत्या आठ दिवसांत अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा ठाणे महानगर पालिका मुख्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सन २०१९ मध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा मांडला होता आणि त्यावेळी प्रशासनाकडून अहवाल मागवून त्वरीत कारवाई करू असे सांगण्यात आले होते. त्यानंतर अनेकवेळा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला पण, प्रत्येक वेळी काही ना काही कारणे देऊन टाळण्यात आले होते.

नुकतेच घाटकोपर इथे अनधिकृत होर्डिंग्ज दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेले. ठाण्यात अशा दुर्घटनेची वाट बघताय का? ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. ह्या सगळ्याला कोण परवानगी देत आहे ? याची संख्या किती आहे ? ही माहिती नागरिकांना कळणे गरजेचे आहे तसेच यात महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिली आहे.

Related posts

इंद्रायणी नदीकाठ परिसरातील मद्य विक्री थांबवून संत भूमीचे पावित्र्य राखा : बाबा कांबळे

editor

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील मुंबईतील पूरस्थितीचा आढावा

editor

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा

editor

Leave a Comment