Civics Mahrashtra

वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

Share

जालना,१७ जून :

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अंतरवाली सराटी या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्री या गावांमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी मागील चार ते पाच दिवसापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसले आहेत

यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की सरकारने खुशाल मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र ते ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून न देता स्वातंत्र आरक्षण द्यावे जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र सरकार व काही मराठा नेत्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसी आरक्षण लाटण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हे चुकीच आहे आणि त्यालाच वाचा फोडण्यासाठी राज्यातील कोट्यवधी ओबीसी समाज हा लोकशाही मार्गाने ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असून त्याच पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसापासून मी आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याची माहिती उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून एक शिष्टमंडळ मुंबई येथून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात येऊन या उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही तुम्ही उपोषण सोडा अशी हाक सरकारच्या वतीने या ठिकाणी भेटीसाठी आलेले मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे माजी मंत्री भागवत कराड यांनी केली,

मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या त्यानंतरच आम्ही उपोषण सोडू अशी ठाम भूमिका यावेळी उपोषण करते लक्ष्मण हाके यांनी घेतली सुमारे १५ ते २० मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना सरकारच्या वतीने मुंबई येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून लवकरच यावर काहीतरी तोडगा निघेल अशी माहिती मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे.

Related posts

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची एस आर ए कार्यालयावर धडक !

editor

‘मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

editor

Leave a Comment