Civics Education Mahrashtra

बदलत्या काळात आपण अद्ययावत होण्याची गरज – राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आवाहन

Share

पुणे ,दि.28 जानेवारी : (विशेष प्रतिनिधी ) :

आजमितीला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत आहेत. या आधुनिक काळात आपण देखील शालेय शिक्षण क्षेत्रात अद्ययवत होण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन शालेय शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे शक्य झाले आहे असे मत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले. बालभारतीच्या ५८ व्या वर्षापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्रसिद्ध व्याख्याते दत्ता कोहिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रमणबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यंनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘शिक्षणगाथा’ या त्रैमासिकाच्या जानेवारी ते मार्च या अंकांचे प्रकाशन शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांच्या हस्ते पार पडले. ५० वर्षांहून अधिक काळ बालभारती दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देत आहे ही अभिमानस्पद बाब असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. तसेच माझा भाऊ युपीएससीची परीक्षा देत होता त्यावेळी मला पहिल्यांदा बालभारतीबाबतची माहिती मिळाली असल्याची आठवण देखील यावेळी आयुक्तांनी आवर्जून सांगितली. आधुनिकतेची कास धरून वाचन संस्कृती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे म्हणत पुस्तक वाचण्याची संस्कृती महाराष्ट्रातील नागरिकांनी घराघरात पुनर्जीवित करावी असे आवाहन शिक्षण आयुक्त सिंह यांनी यानिमित्ताने केले.

कार्यक्रमादरम्यान शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व व्याख्याते दत्ता कोहिनकर यांनी मार्मिक शब्दात सांगितले. राज्यमंत्री, शालेय शिक्षण डॉ. पंकज भोयर यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी केले. बालभारतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्हाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सरोदे यांनी तर प्रवीण निगडे यांनी आभार मानले.

Related posts

लोककल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विधानमंडळाची वाटचाल -सभापती प्रा. राम शिंदे

editor

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

editor

वेसावे गावातील तीन अनधिकृत इमारती निष्कासित : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामाविरोधात कठोर कारवाई सुरू

editor

Leave a Comment