Civics

डोंबिवली एमआयडीसी कंपन्यांच्या स्थलांतरणाचा निर्णय घेताना इतर बाबींचा देखील विचार करणे आवश्यक-रविंद्र चव्हाण

Share

कल्याण,१२ जून :

डोंबिवली एमआयडीसी मधील इंडो अमाईन्स या दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने सर्व कामगारांनी बाहेर पळ काढल्याने कोणत्याही जीवितहानी झाली नाही.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज या घटनास्थळाचे पाहणी केली यावेळी बोलताना मंत्री चव्हाण यांनी एखादा उद्योजक मेहनत करून बँकांचे कर्ज घेऊन कंपनी उभी करतो कोणत्यातरी निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असतात. एकंदरीतच कंपन्यांमध्ये सेफ्टी नॉम्स कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत. यासाठी यंत्रणा उभे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.

अति धोकादायक केमिकल कंपन्यांना स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी एखादा उद्योग उभा राहतो त्यामध्ये फक्त उद्योगच उभा राहत नाही तर त्या भागातील सर्व परिसरात अनेक जण त्यावर त्या उद्योगावर अवलंबून असतात. त्यामुळे स्थलांतरणाचा निर्णय घेताना या सर्व बाबींचा विचार होणे देखील गरजेचे आहे .

१९७० -७१ च्या दरम्यान पहिल्यांदा एमआयडीसी या ठिकाणी आली त्यानंतर आजूबाजूला नागरिकरण वाढलं . एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांबाबत सरकार आणि संबंधित विभागाने उपाययोजना तसेच फायर ऑफिसर याची नेमणूक करणे, दुर्घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

Related posts

दुधाला हमीभाव देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांची केंद्राकडे मागणी

editor

Supreme Court Orders Release of NewsClick Editor Prabir Purkayastha, Declares Arrest Illegal

editor

इंद्रायणी नदीकाठ परिसरातील मद्य विक्री थांबवून संत भूमीचे पावित्र्य राखा : बाबा कांबळे

editor

Leave a Comment