crime Mahrashtra

कल्याणमध्ये किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देणाऱ्या तरुणाला महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Share

किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंकुश सिंह असे या तरुणाचे नाव असून या तरुणाकडून १३ हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे.

अंकुश सिंह हा दिल्लीचा राहणारा आहे. तो दिल्लीत रॅपिडो बाईक चालवितो. त्याला या नकली नोटा बाजारात चालविण्यात दिल्या होत्या. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील बाजारपेठेत एक तरुण शंभर दोनशे रुपयांमध्ये काही वस्तू खरेदी करीत आहे. परंतू तो ज्या नोट्या देत आहे. त्या नोटा नकली असल्याचा संशय एका फळ विक्रेत्याला आला. त्याने याची माहिती त्याच्या मित्राला दिली. मित्राने ही माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलिसांना दिली.

पोलिसांनी त्वरीत स्टेशन परिसरात त्या व्यक्तीचा शोध सुरु केला. २० मिनिटांत या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची विचारपूस सुरु केली. त्या तरुणाने त्याचे नाव अंकुश सिंह असे सांगितले. तो दिल्लीचा राहणारा आहे. दिल्लीत तो रॅपिडो बाईक चालवतो. कल्याणमध्ये तो त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी आला होता. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १३ हजार रुपयांच्या नकली नोटा सापडल्या आहेत.

या प्रकरणाचा तपास कल्याणचे डिसीपी गुंजाळ यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांच्या नेतृत्वात सुरु झाला आहे. अंकुश सिंह याला या नोटा चालविण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने दिल्या होत्या. या नोटा त्याने चालविल्यास त्याला पुढेही काम दिले जाईल असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. समोरच्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलिस पथक दिल्लीला रवाना झाले आहेत अशी याची माहिती एनआयएला देखील देण्यात आली आहे.

Related posts

Karnataka CM Seeks Revocation of MP Revanna’s Diplomatic Passport

editor

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत इसमाने केली दोघांची ८० लाखांची फसवणूक

editor

Delhi Court Rejects Bail for Umar Khalid in 2020 Delhi Riots Case

editor

Leave a Comment