मुंबई, दि. १८ प्रतिनिधी :
गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी कोकणात दाखल होतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात येते. यंदाही रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष सात ट्रेन सोडणार आहे. या गाड्यांचे बुकिंग कधी करता येणार, कोकणात जाण्यासाठी आता चाकरमान्यांची लगबग सुरू होईल. रेल्वेसाठी काही महिने आधीच बुकिंग करावं लागतं. प्रवाशांची हीच गरज लक्षात घेऊन रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
तसंच, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग मेपासूनच सुरू करण्यात आले होते. आताही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सात गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.कोकणात जाणाऱ्या या गाड्यांचे आरक्षण २१ जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण रविवारी २१ जुलैपासून सकाळी ८ पासून सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
1) मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) – ०११५१
2) मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५३
3) एलटीटी – कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या) ०११६७
4) ०११७१ स्पेशल एलटीटी मुंबई येथून (३६ फेऱ्या)
5) दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून
6) एलटीटी – कुडाळ स्पेशल (१६ सेवा) – ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
7) एलटीटी कुडाळ स्पेशल (६ सेवा) -०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून