Civics national

भारताला जोडणारी ” राष्ट्रीय एकात्मता यात्रा “

Share

मुंबई , दि.10 फेब्रुवारी : ( रमेश औताडे )

पूर्वोत्तर भारत आणि देशातील इतर भागाला जोडणारी ” राष्ट्रीय एकात्मता यात्रा ” आहे. असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत एका जाहीर पत्रकार परिषदेत केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आंतर-राज्य छात्र जीवन दर्शन आयोजित ‘राष्ट्रीय एकात्मता यात्रा २०२५’ जनता अभिनंदन सोहळा मुंबई विद्यापीठात संपन्न झाला. यावेळी संघटनमंत्री आशिष चौहान, मुंबई विद्यापीठाचे डॉ. रवींद्र कुलकर्णी, विशाद मफतलाल, सचिव दीपक दळवी, गितेश सामंत, रुपाली बोरीकर, प्रशांत माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“वेगळ्या भाषा, वेगळे वेश, तरीपण महान भारत देश’, अशी घोषणा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ते देत असतात. ही घोषणा म्हणजे ‘अभाविप’ आणि राष्ट्रीय एकात्मता यात्रा यांच्यातील साम्यता आहे. देशात एकात्मतेचा भाव विविध समाजात निर्माण व्हावा हा या यात्रेमागचा उद्देश आहे असे आशिष चौहान यांनी सांगितले.

एकूण ३२ प्रमुख विभागात २३० युवा प्रतिनिधी या यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यात १२५ युवक आणि १०५ युवती आहेत. ६८ हे जनजाती क्षेत्रातील आहेत. मुंबई, दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, नंदुरबारमधून यात्रा सुरू आहे.

Related posts

राज्यातील महावितरण पोस्टपेड विद्युत मीटर बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

editor

मार्गशीर्ष महिन्यानिमित्त फुले बाजारात दाखल; विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता

editor

गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार ! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक

editor

Leave a Comment