Share
मुंबई,दि १९ प्रतिनिधि :
पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि दगडगोट्यांनी महामार्ग धोकादायक बनला आहे. महामार्गाच्या या प्रश्नावर खासदार सुनिल तटकरे यांनी आज खारपाडा, पेण ते नागोठणे, इंदापूर, माणगाव पट्ट्यात पाहणी दौरा केला आहे.
यावेळी त्यांनी पेण प्रांताधिकारी कार्यालय व नागोठणे कामत येथे बैठक घेऊन जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या आहेत. अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. निष्क्रिय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र दिले आहे तसेच जुने काम पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे मात्र अधिकच्या कामासाठी निधी लागल्यास तो नितीन गडकरी यांच्याकडून मिळवण्यात यश येईल अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.