Share
यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने न्यायाधीन कैद्यांनी राडा घालून तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, कारागृह अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल केला. ओंकार कुंडले, जुनेद फारुक शेख, सतपाल रुपनवार, नैनेश निकम, आकाश भालेराव, सोहेल मेहबूब बादशाह मनोज शिरशीकर, नामदेव नाईक अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
