Share
नवी मुंबई , दि.28 नोव्हेंबर :
विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पनवेल महानगर पालिकेसाठी सुद्धा स्थानिक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल पालिकेवर भाजपची सत्ता आहे..मात्र मालमत्ता कराच्या मुद्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होत.
पनवेलच्या जनतेचा मालमत्ता करासंदर्भातील गैरसमज दूर झाला असल्याचं माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.त्यामुळे आता पालिका निवडणुकीचे वारे वाहत असल्याचं दिसत आहे.