धुळे
इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आम्ही घेतलेले निर्णय व आमच्या योजना काँग्रेस काढून घेणार या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपावर नाना पटोले यांनी जोरदार प्रति उत्तर दिला आहे.
भाजपची कोणतीही योजना नाही मोफत अन्नधान्य देणार ही आमची योजना आहे उलट आम्ही या योजनेत गोरगरिबांना खायचं तेल, साखर, डाळ देऊन योजना वाढवणार तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला देखील काम देणार. सत्ता आल्यावर राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करणार असून सनातन धर्मातील शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता आणि हिंदू धर्मातील जे चारही शंकराचार्य आहेत त्यांच्या हातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार स्थापन केला जाईल.
राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या मार्गाने काम केले आहे आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने करू असे जोरदार प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळ्यात आहेत यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींच्या आरोपाला प्रति उत्तर दिले आहे,
