Mahrashtra

झारखंडच्या मंत्र्याच्या सचिवाच्या घरी ईडीचा छापा,सापडले नोटांचे घबाड

Share

पीटीआय वृत्त

रांचीमध्ये ईडीचे छापे: झारखंडच्या मंत्र्यांच्या सचिवावर ईडीचा छापा, मोठी रोकड जप्त.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी रांचीमधील विविध ठिकाणी छापे टाकले झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
ईडीच्या सूत्रांकडून असे सांगण्यात आले आहे की,जप्त केलेल्या रोख रकमेची अचूक रक्कम निर्धारित करण्यात येत असून,अंदाजे ₹ 20-30 कोटींच्या दरम्यान आहे. बहुतांश रोख रक्कम ₹ 500 मूल्यांमध्ये आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यासोबत काही दागिनेही जप्त केले आहेत, असे पीटीआय ने दिलेल्या वृत्तात सांगितले आहे

Related posts

Maharashtra Probes Porsche Crash Blood Tampering

editor

दुधाला हमीभाव देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांची केंद्राकडे मागणी

editor

आषाढीनिमत्त एसटी महामंडळातर्फे जादा बस सोडण्याचे नियोजन

editor

Leave a Comment