गोंदिया :
गोंदिया जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं असून या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हे खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान पीक हे लवकरात लवकर कापण्यासाठी म्हणून पारंपारिक पद्धतीने कापणी न करता हार्वेस्टर चा वापर करून शेतामध्ये कापणी करत आहेत.
जेणेकरून लवकरात लवकर कापणी करून आपला धान्य हे सुरक्षित ठेवता येईल आणि त्याकरिता शेतकरी आता अत्याधुनिक अशा हार्वेस्टर कडे वळले आहेत आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून शेतातील धान पिकाची कापणी करत आहेत दर तासाला ४००० रुपये प्रमाणे हार्वेस्टरच्या खर्च शेतकरी करत असून या हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांना धान्य जमा करता येते आणि मजुरांचा त्रासही कमी होतो.
म्हणून ग्रामीण भागात, शहरी भागात सुद्धा या हार्वेस्टरला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पसंती देऊन शेतकरी हे लवकरात लवकर धान कापण्यासाठी आता या मशीनकडे वळले आहेत.
