health International national

युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!

Share

तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत करणार संबोधन

सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या लौकिकात मानाचा तुरा

कोल्हापूर : २० मे

मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांना भारतातून सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून प्रतिष्ठीत नामांकन मिळाले असून, त्यांना जून 2024 इस्तंबूल, तुर्की येथे होणाऱ्या ” यासरगिल मायक्रोन्युरोसर्जरी ” काँग्रेसमध्ये “वक्ता आणि प्राध्यापक” म्हणून विशेषाधिकाराने आमंत्रित करण्यात आले आहे.

गाझी यासरगिल हे 98 वर्षांचे दिग्गज न्यूरोसर्जन आणि आधुनिक मायक्रोन्युरोसर्जरीचे जनक म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांना भेटणे ही कोणत्याही न्यूरोसर्जनसाठी आयुष्यभराची उपलब्धी असते, अशा प्रतिष्ठित अकादमीमध्ये वक्ता म्हणून नामांकन मिळणे आणि आमंत्रित करणे ही एक गौरवाची बाब आहे. या विशेष अधिवेशनासाठी भारतातून निवडक अशा १० न्यूरोसर्जन यांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांची निवड गौरवास्पद आहे.

त्यासाठी कणेरी येथील ग्रामीण भागात गेली १० वर्ष अविरत सेवा देणाऱ्या डॉ.शिवशंकर मरजक्के यांनी मेट्रो शहरात होणाऱ्या मेंदूच्या अनेक अत्यंत जटील शस्त्रक्रिया ग्रामीण भागातील सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये केल्या आहेत, त्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल हे ग्रामीण भागात अत्याधुनिक सेवा देणारे केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. या धर्मादाय रुग्णालयात एक टीम म्हणन कार्यरत असून तेथे अत्याधुनिक न्यूरोसायन्सचे युनिटची स्थापना करण्यात आली असून मेंदूचे बायपास, एन्युरिझम सर्जरी, कॉम्प्लेक्स स्कलबेस व एंडोस्कोपिक मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि एपिलेप्सी शस्त्रक्रिया) या शस्त्रक्रिया केल्या जातात.

डॉ.शिवशंकर मरजक्के यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल आतंरराष्ट्रीय स्तरावर घेवून त्यांना या विशेष अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजीसिद्धगिरी हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने त्यांच्या या तुर्की दौऱ्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व त्यांना या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related posts

एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी

editor

Stock Markets Closed May 20 for Mumbai Elections

editor

Slovakia’s Prime Minister Robert Fico Shot and Critically Injured; PM Modi Expresses Shock

editor

Leave a Comment