Culture & Society Mahrashtra

आषाढी एकादशी यात्रेसाठी जादा अनुदानाची जिल्हाधिकार्यांची शासनाकडे मागणी

Share

पंढरपुर,१२ जून :

आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी दहा लाखाहून अधिक भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देताना प्रशासनावर आर्थिक ताण येतो. त्यामुळे यात्रा अनुदानात वाढ करण्यात यावी असा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

आषाढी एकादशी सोहळा १७ जुलै रोजी साजरा होणार आहे. आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. यामुळे यात्रेचे नियोजन करण्यासाठी पंढरपुरातील भक्तनिवास येथे आज जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सरदेशपांडे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा द्याव्यात, अशी सूचना केली तसेच प्रत्येक विभाग यात्रा कालावधीत कोणकोणते काम करणार आहे, याचा आढावा घेतला तसेच येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

पालखी मार्ग व पंढरपुरात भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. ६५ एकर चंद्रभागा वाळवंट दर्शन मंडप मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असते. यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनर्थ घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी १२ लाखाहून अधिक भाविक येणार आहेत. त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यामुळे यात्रा अनुदानात वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाला दिला आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Related posts

वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

editor

Ruskin Bond’s 90th Birthday Interview Sparks Debate on Tourist Site Policies

editor

राज्यातील लोकसभा निडणूका संपल्या सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे: नाना पटोले

editor

Leave a Comment