Civics Mahrashtra

भोकरदन जालना महामार्गावर नांजा फाट्यावर मराठा समाज बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन

Share

जालना , १३ जून :

जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरांमध्ये भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर नांजा फाट्यावर मराठा समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील सहा दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाकडे प्रशासन व शासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवत मराठा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे व जरांगे पाटील यांच्या अटी मान्य करत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे.

याप्रसंगी बोलताना मराठा आंदोलन म्हणाले की सरकार फक्त मराठा समाजाची दिशाभूल करत असून तारीख पे तारीख देत आहे मात्र आता तारीख पे तारीख नसून प्रत्यक्षात अंमलबजावणी जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत आता मराठी मागे हटणार नाही अशी भूमिका आज या आंदोलनादरम्यान मराठा समाज बांधवांनी घेतली होती यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी आंदोलकांची समज काढत मराठा समाज बांधवांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या आंदोलनामुळे काही काळ ज्यांना भोकरदन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या होत्या.

Related posts

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये 1333 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातूनही दिले मतदान प्रक्रियेचे धडे

editor

टॅक्सी विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

editor

शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना

editor

Leave a Comment