Civics

कोयना प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे कोकण आयुक्तांना आदेश

Share

भिवंडी प्रतिनिधी , ५ जुलाई :

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर बुधवारी ३ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ पदाधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीत कोयना प्रकल्पग्रस्त पदाधिकारी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकारात्मक बैठक पार पडली.

यावेळी पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील, पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, सचिव अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, उपाध्यक्ष अमोल कदम, आनंद सकपाळ, अर्जुन कदम, बळीराम शिंदे, पवन कदम, किसन जाधव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवन्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Related posts

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

विधानसभेनंतर आता पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध

editor

तुडुंब भरलेल्या नाल्यातील दुर्गंधी बाबत पालिका गप्प का ?

editor

Leave a Comment