Civics Mahrashtra

महानगरपालिकेने केल्या अनधिकृत हातगाड्या जप्त .

Share

मुंबई, ७ जुलाई :

बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत दिनांक १८ जून ते ०४ जुलै २०२४ या गत सतरा दिवसात विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे ५ हजार ४३५ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात १ हजार १८६ चारचाकी हातगाड्या, १ हजार ८३९ घरगुती गॅस सिलिंडर आणि २ हजार ४१० इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.

मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱया तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱया फेरीवाल्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते.

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीसांनी संयुक्त कार्यवाही सुरू आहे.मुंबईतील विविध विभागांमध्ये १८ जून २०२४ पासून ते ०४ जुलै २०२४ या सतरा दिवसात झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत

Related posts

१२ आयएस अधिकारी प्रतिक्षेत असताना आयआरएस अधिकारी सुधाकर शिंदे प्रतिनियुक्तीवर राज्यात कसे ? – सुनील प्रभू

editor

आघाडीने वंचितला जाणीवपूर्वक डावलले : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

editor

हरितक्रांतीचे जनक, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या : नाना पटोले

editor