मुंबई प्रतिनिधि, ८ जुलाई :
भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या २० वर्षांपूर्वी कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव नगरसेवक म्हणजे राजू शिंदे आहेत. दोन नगरसेवक सोडता कोणीही भारतीय जनता पार्टी सोडली नाही. त्यामुळे फार काही खिंडार आम्हाला पडला अशातला भाग नाही. आणि हे गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीला ही कोणता फरक पडणार नाही असं भागवत कराड म्हणाले.
लोकसभा ची जागा आम्हाला सुटली नाही याची खदखद देखील त्यांच्या मनात असल्याच भागवत कराड यांनी सांगितलं. शिवाय राजू शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणूक ही पश्चिम मतदार संघातून लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.मात्र महायुतीचे संजय शिरसाठ इथे विद्यमान आमदार आहेत.
राजू शिंदे यांना ठाकरे गटात चांगली संधी मिळते म्हणजेच पश्चिम मधून त्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे ते तिकडे गेले असावेत. त्यामुळे कोणतीही गळती पक्षाला लागलेली नाही.
राजू शिंदे यांना ठाकरे गटाकडून आश्वासन दिले असल्यामुळे ते ठाकरे गटात गेले असा विश्वास भागवत करणारा व्यक्त केला. विशेष म्हणजे पश्चिम मतदार संघातून चंद्रकांत खैरे यांच्यासह दहा जण विधानसभेची तयारी करत असल्याचे दावा कराड यांनी केला आहे. त्यासाठी मला चार लोकांचे फोन आले.
विधानसभेच्या पूर्वी आमच्याकडे देखील बडे नेते येणार असून बडे धमाके होणार असल्याचा दावा भागवत कराड यांनी केलाय.