Mahrashtra

लोककल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विधानमंडळाची वाटचाल -सभापती प्रा. राम शिंदे

Share

मुंबई, दि, २६ जानेवारी :

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आपले विधानमंडळ लोककल्याणाचा विचार दीपस्तंभाप्रमाणे डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे, असे सांगून सभापती प्रा. शिंदे यांनी विधानमंडळाचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास विनाव्यत्त्यय होणे, समिती पद्धत अधीक सक्षम करणे, चर्चेनंतरच विधेयक संमत होणे आणि अर्थसंकल्पीय बाबींवर सदस्यांना मार्गदर्शन, ही आपली पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज अग्रक्रमासाठी चतु:सुत्री राहील, असे यावेळी स्पष्ट केले. भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय राज्यघटना अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत राज्यघटनेमुळे भारतातील संसदीय लोकशाही वैश्विक स्तरावर अधिक प्रभावी आणि प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोककल्याणकारी राज्य संकल्पनेचा विचार पुढे नेला. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त प्रा. राम शिंदे यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related posts

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

editor

लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले

editor

महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळणार ; भाजपा आ. दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

editor

Leave a Comment