मुंबई ,दि.10 फेब्रुवारी : ( रमेश औताडे )
खेडेगावातील रस्ते, पुल, सरकारी रुग्णालये असे अनेक ठिकाणी सरकारने बांधकाम भूमिपूजन केले आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर काही बांधकाम पूर्ण झाली आहेत. मात्र कंत्राटदारांची ९० हजाराची देणी बाकी आहेत. आम्ही यापुढची कामे कशी करायची ? असा सवाल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ने मुंबईत एका जाहीर पत्रकार परिषदेत सरकारला केला आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना एकत्र आल्या असून त्यांनी सरकारी बांधकामगेल्या पाच दिवसांपासून थांबवले आहे. पायाभूत व बांधकाम प्रकल्पांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने प्रलंबित कंत्राटदारांनी आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएआय चे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यावेळी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल ४६,००० कोटी रुपये, ग्रामविकास विभागाकडून ८,००० कोटी रुपये, जल जीवन मिशनकडून १८,००० कोटी रुपये, जलसंपदा विभागाकडून १९,७०० कोटी रुपये, नगरविकास विभाग १७,००० कोटी येणे बाकी आहे.
‘बीएआय’ चे माजी अध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, “गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जी कामे केली गेली आहेत, त्यांच्यापोटी जो परतावा येणे बाकी आहे. तर राज्य अध्यक्ष अनिल सोनावणे म्हणाले, आम्ही आता कायदेशीर कारवाई करण्याचाही विचार करत आहे.