Mahrashtra politics

आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही – सुनिल तटकरे

Share

रोहा,१६ जून :


राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला.


रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित भावनेने या भागासाठी त्याग केला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.


देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.


या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.


या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Related posts

Supreme Court Declines Urgent Hearing on Arvind Kejriwal’s Plea for Bail Extension

editor

Nawaz Sharif’s Admission: Pakistan’s Violation of the 1999 Peace Agreement with India

editor

झारखंडच्या मंत्र्याच्या सचिवाच्या घरी ईडीचा छापा,सापडले नोटांचे घबाड

editor

Leave a Comment