politics

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली करायचा आहे – सुनिल तटकरे

Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरुवात…

‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यव्यापी दौऱ्याचा झंझावात सुरू…

अहमदनगर दि. १८ जून :

आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले.

‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अहमदनगर जिल्हयातून केली.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तिथपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी या अहमदनगर जिल्ह्यातून झाली म्हणून या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना यापूर्वी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला तसाच पुन्हा एकदा अजितदादाला पाठिंबा देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. याच आधारावर लोकसभा निवडणूक राज्यात लढली गेली शिवाय ही निवडणूक अक्षरशः ग्रामपातळीवर नेऊन ठेवली गेली. मात्र असे असताना नगर शहराचे तरुण आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीच्या उमेदवारांना ३२ हजाराचे लीड देत या सगळ्यावर मात करून दाखवले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले.

पक्षाचा कार्यकर्ता हा धोरण समोर ठेऊन आणि नेता जे काम करतो ती भूमिका घेऊन काम करत असतो त्यावेळी नेत्याच्या त्या संवेदना घेऊन लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचायचे असते असेही सुनिल तटकरे म्हणाले.

यापुढे सर्वांनी जबाबदारीचे भान लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे सांगतानाच विरोधकांनी ज्यापद्धतीने गैरसमज पसरवले आहे ते कसे चुकीचे आहे हे लोकांना सांगायची गरज आहे असे आवाहन कार्यकर्त्यांना सुनिल तटकरे यांनी केले.

अजितदादांचे नेतृत्व व्यापकतेने पुढे न्यायचे असेल तर अजितदादांना ताकद देणे गरजेचे आहे. जनाधार वाढवण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे असा विश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.

भाजपकडे जाऊन सत्तेत सहभागी होणार होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

यापुढे सर्व घटकांना सोबत घेऊन काम करायचे आहे. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही हे आपण सांगत आहोतच परंतु लोकसभा निवडणुकीत जे जे घटक बाजूला गेले आहेत त्या घटकांना सोबत आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

योग्य भूमिका घेऊन लोकांसमोर गेलो तर पक्षाचे व्यापक हित जोपासणारे आणि जो आपल्यासाठी दिवसरात्र काम करतोय त्याला जनमानसात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

निवडणूक विकासावर लढली गेली नाही मात्र यावेळी लोकसभेत आलेले अपयश विसरुन किंवा झालेल्या चूका दुरुस्त करुन विधानसभा निवडणुकीत यशाची पायरी नक्की मिळवू असा विश्वास महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

या आढावा बैठकीत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप यांनी आपले विचार मांडले.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, फ्रंटल सेल व प्रमुख तसेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर दुपारी अहमदनगर दक्षिण ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहूरी यामधील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतला.

विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार संग्राम जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे,महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts

Disappearance of Bangladeshi MP in Kolkata Raises Concerns

editor

आरक्षणाबाबत शरद पवार, उद्धव ठाकरेंनी आपली भुमिका महाराष्ट्रासमोर जाहीर करावी – प्रविण दरेकर

editor

Controversy Over Pro-tem Speaker Selection in 18th Lok Sabha

editor