politics

राज्यसभेनंतर मंत्री पदासाठी देखील राष्ट्रवादीत रस्सीखेच

Share

मुंबई प्रतिनिधी ,१७ जून :

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आणि त्यांच्या समवेत ७१ लोकांनी मंत्रीपदाची शपथ ही घेतली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कोणीही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामील झाले नाही. त्यामुळे हे मंत्रीपद कोणाच्या पदरात पडणार यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी राज्यमंत्रिपद नाकारले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्याने सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रिपद देण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आले तर ते मलाच मिळणार, असेही पटेल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रातील राज्यमंत्री पदावरून प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेले सुनील तटकरे हेदेखील इच्छुक होते परंतु आपल्याला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद हवे असा अट्टाहास धरत अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव पुढे केले होते. त्यासाठी त्यांनी प्रफुल्ल पटेल हे यादी कॅबिनेट दर्जाचे मंत्री असल्याचा हवाला दिला होता. जे मिळते ते आपल्या पदरात पाडून घ्यावे असे सुनील तटकरे यांचे मत होते. त्यामुळे पक्षांतर्गत रस्सीखेच मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी मिळाल्याने त्यादेखील याच रेसमध्ये असल्याचे सांगितले जात आ

Related posts

Controversy Erupts Over Mani Shankar Aiyar’s Remark on 1962 India-China War

editor

महाविकास आघाडी तुटेल पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणार नाही

editor

India’s Foreign Minister Confronts Western Allegations and Influence

editor

Leave a Comment