crime

नाशिक पोलिसांनी खूनाचा गुन्हा अवघ्या २४ तासामध्ये आणला उघडकीस ;पुणे येथून चार आरोपींना केली अटक…

Share

नाशिक प्रतिनिधी , १७ जून :


म्हसरूळ पोलीस हद्दीतील खूनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये उघडकीस आणला असून चार आरोपींना गजाआड केले आहे. रामवाडी येथील रिक्षाचालक प्रशांत तोडकर याची अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून दगडाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर गुन्हेशाखा युनिट क १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याचे समजले. त्यानंतर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले.


याप्रकरणी आज अधिक माहिती देताना पोलीस उप आयुक्त (गुन्हे ) प्रशांत बच्छाव यांनी सांगितले की, आरोपी पिंपरी चिंचवडला असल्याचे कळल्यानंतर नाशिकच्या पथकाने आरोपी यांचा पिंपरी चिंचवड गुन्हेशाखा युनिट क २ चे मदतीने शोध घेऊन थरमॅक्स चौक, निगडी ( पुणे ) येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. य़ा प्रकरणात विजय दत्तात्रय आहेर (वय-३०वर्षे, रा-रामवाडी पंचवटी नाशिक ) संकेत प्रदिप गोसावी ( वय-२६वर्षे, रा-जुईनगर म्हसरूळ पंचवटी नाशिक ), प्रशांत निंबा हादगे, (वय-२९वर्षे, रा- पेठरोड मेहरधाम, पंचवटी नाशिक ), कुणाल कैलास पन्हाळे ( वय-३०वर्षे, रा-दिंडोरीरोड पंचवटी, नाशिक ) यांना ताब्यात घेतले.


दरम्यान, त्यांची चौकशी केल्यानंतर विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्या काही दिवसापूर्वी शाब्दीक वाद झाला होता. १५ जून रोजी शाब्दीक वादाचे रूपांतर भांडणात झाले प्रशांत तोडकर यांच्या डोक्यात दगड घालुन खून केला असल्याचे सांगून गुन्हयाची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.


सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक. , पोलीस उप आयुक्त ( गुन्हेशाखा ) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि रविंद्र बागुल यांनी केली आहे.

Related posts

Delhi High Court Grants Bail to Sharjeel Imam in Riots Case

editor

भिवंडी महापालिकेची अनधिकृत नळजोडणी प्रकरणी धडक कारवाई सुरूच

editor

Parvez Tak Sentenced to Death for 2011 Murders of Actor Laila Khan and Family

editor