Civics

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती

Share

नवी मुंबई, ७ जून :

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३६ नुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. तसेच काही कालावधीसाठी त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांना पनवेलच्या राजकीय व भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असलेले असे आयुक्त असणार आहेत.

Related posts

राज्यातील लोकसभा निडणूका संपल्या सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे: नाना पटोले

editor

महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळणार ; भाजपा आ. दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

editor

Supreme Court Orders Release of NewsClick Editor Prabir Purkayastha, Declares Arrest Illegal

editor