Civics Mahrashtra

काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले

Share

मुंबई , ७ जुलाई :

येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती आणि पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात पाठवावेत, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केले आहे.

विधानसभा उमेदवारीचे अर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर मुंबई येथे तसेच सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. या अर्जासोबत पक्ष निधी म्हणून सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये द्यावे लागणार आहेत. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करतील त्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाने १० ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत, अशी सूचना पक्षाने केली आहे.

मतदार याद्या अद्ययावत करण्यावर भर द्याअर्म्यान, मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून २५ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पहावे. नसल्यास ती नावे पुन्हा यादीत सामाविष्ठ करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच नाव, पत्ता यात काही बदल करावयाचा असल्यास ती सर्व कामे करून मतदार यादीत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी, अशी सूचना काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Related posts

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णीपोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

editor

कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का ?

editor

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात रस्ते कामांच्या प्रश्नासाठी माजी आमदार अनिल गोटेंचे देहत्याग आंदोलन

editor

Leave a Comment