Civics Mahrashtra

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात रस्ते कामांच्या प्रश्नासाठी माजी आमदार अनिल गोटेंचे देहत्याग आंदोलन

Share

धुळे ,१४ जून :

धुळे शहरातील रस्ते महामार्ग क्र.३ ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात कृषी महाविद्यालयाचे अधिक्षक, धुळे मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग खोडा घालत असलयाचे आरोप करत ३१ जुलै २०२४ पर्यंत रस्ते विकास कार्याच्या विकास कामाला सुरुवात झाली नाही तर रस्त्याच्या कामाचे ४२ कोटी रुपये शासनाकडे परत जाण्याची शक्यता असल्याने रस्त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या तिन्हीही संस्थां विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पासून देहत्याग आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

लोकसंग्राम पक्ष्याच्या कार्यालयापासून परिसरात मोर्चा काढत आपल्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार अनिल गोटे यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयाला धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, कृषी महाविद्यालय विभाग या तिन्ही संस्था या रस्त्या कामांबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत देहत्याग आंदोलन करण्याचा निर्णय माजी आमदार गोटे यांनी घेतला आहे.

Related posts

Samruddhi Mahamarg Nears Completion in Thane District

editor

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

editor

‘मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

editor