Civics

सांगलीच्या कृष्णा नदी मध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन

Share

मुंबई , ७ जून :

संभाव्य मान्सून लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदी मध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये नदी पात्रात प्रात्यक्षिके घेण्यात आली.

संभाव्य मान्सून आणि अतिरिक्त पावसाची शक्यता यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवित हानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आपत्ती निवारण कक्ष आणि महापालिका आपत्ती निवारण केंद्र यांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी व आयुक्त महोदय यांनी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत नदीपात्र तसेच परिसराची पाहणी केली. यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभाग आणि आपत्ती मित्रांच्या माध्यमातून करण्यात आले.

या प्रात्यक्षिकास अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव सहदेव कावडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा आपत्ती नियोजन अधिकारी नदाफ, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी, मालमत्ता अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, उपअभियंता महेश मदने, रॉयल कृष्णा बोट क्लबचे दत्ता पाटील यांच्यासहित अग्निशमन जवान आपत्ती मित्र उपस्थित होते.

Related posts

सर्वाधिक पुरवणी मागण्यांचा विक्रम, ९४००० कोटींच्या मागण्या सादर

editor

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा

editor

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये 1333 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातूनही दिले मतदान प्रक्रियेचे धडे

editor

Leave a Comment