Share
कल्याण प्रतिनिधि,७ जुलाई :
कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुलाखालून वाहणाऱ्या उल्हास नदीत फूले टाकण्यासाठी एक वृद्ध महिला आली होती मात्र, काही वेळाने ही महिला त्या ठिकाणी दिसत नसल्याचे एका नागरिकाने पाहिले. त्यांनी याबाबत गांधरी पुलावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला माहिती दिली.
हे ऐकताच पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या ट्रॅफिक वॉर्डनसोबत नदीत उडी मारली. त्यांना महिलेची साडी दिसली. साडीला खेचताच महिलेचा हात पोलिस कर्मचाऱ्याच्या हाती आला. महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मच्छिंद्र चव्हाण असे या धाडसी व प्रसंगावधान राखणाऱ्या वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव आहे. मच्छिंद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या वृद्ध महिलेला जीवनदान मिळाले आहे.