गोंदिया , ७ जुलाई :
गोंदिया जिल्ह्याच्या सरक अर्जुनी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेव कीरसान यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट , भाजपा आणि इतर पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी यावेळेस काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू राहणार असल्याचे यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी सुद्धा आपल्या हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत प्रक्ष प्रवेश केला आहे.
मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे काँग्रेसमध्ये येणार असून येणाऱ्या निवडणुकीच्यापूर्वी अजून मोठ्या प्रमाण कार्यकर्ते येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.