Culture & Society

रंगभूमी कला प्रसारासाठी रंगमंचीय खेळांचा अभिनव वापर करा – प्रा. देवदत्त पाठक

Share

मुंबई,३० मे :

शहर सर्व सुविधांनी संपन्न असताना गाव उपनगर मात्र तशीच तहानलेली राहतात ,तिथे सर्व प्रकारच्या कलांचं संवर्धन सुविधा मिळणं खूप अवघड आहे, अशा वेळेला सर्व कलारंगकर्मींनी आपल्यातील कला अनुभव हा गावातील कला साधकांना मिळावा, यासाठी वर्षभरातला काही वेळ तरी गावांमध्ये जाऊन नवोदिताना द्यावा, असे मत प्रा. देवदत्त पाठक यांनी रंगभूमी कला अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेच्या २१ कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर केले आहे.


रंगभूमी कला प्रशिक्षणाची पद्धतच बदलायला हवी, त्यासाठी मन बुद्धी आणि शरीर यांना चलित करणारे रंगमंचीयखेळ याचा पुरेपूर अभिनव वापर रंगभूमी कलेच्या सर्व घटकांसाठी करायला हवा .त्यामध्ये लेखन ,दिग्दर्शन ,नेपथ्य, प्रकाश ,संगीत, रंगभूषा वेशभूषा आणि कला व्यवस्थापन या प्रमुख घटकांचा विचार करता येऊ शकतो, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना या रंगमंचीय खेळांचा वापर करून अनुभवातून प्रशिक्षण देण्यात आले ,गावागावातील संयोजकांनी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे संयोजन वर्षभर करूअसा संकल्प केला,हेच या अभिनय कार्यशाळांचे उन्हाळी सुट्टीतील उपक्रमाचे फलित आहे हे ना थोडके.अशा प्रकारच्या कार्यशाळांचे हे दहावे वर्ष आहे.


नाशिक ,सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, नगर, मुंबई ,पनवेल, ठाणे ,बार्शी ,मिरज, अमरावती ,परभणी ,अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर येथील लहान मोठ्या गावात अशा प्रकारच्या कार्यशाळा गेल्या दहा वर्षात घेण्यात आल्या या कार्यशाळेसाठी प्रा. देवदत्त पाठक यांच्याबरोबर त्यांचे सहयोगी विद्यार्थी मिलिंद खेळकर यांचे अनमोल सहकार्य लाभले, त्याचबरोबर गुरुकुल गुफांनच्या टीम मध्ये धनश्री गवस, सीमा जोगदंडकर, उषा देशपांडे, आलोक जोगदनकर ,आकाश भुतकर, नेहा कुलकर्णी इत्यादी अनेक विद्यार्थी मित्रांची टीम यामध्ये सहभागी झाली.


अशा प्रकारच्या मोफत अभिनय प्रबोधन कार्यशाळा वर्षभर दर शनिवार रविवार शिक्षक पालक मुले यांच्यासाठी घेण्याचा संकल्प देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.


स्वाधार ,अक्षरदीप, रेज ऑफ होप, गिन्नीबाई हायस्कूल, भारती विद्यापीठ, कन्या शाळा ,महर्षी कर्वे, ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ,बाल रंगभूमी परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, सिग्नल शाळा, लमान तांडा, बिबवेवाडी ओटा, कात्रज वसाहत, जीनियस स्कूल, मेहेर स्कूल ,अदवंत स्कूल ,इत्यादी अनेक संस्था आणि संयोजकांनी यासाठी मदत केली त्या सर्वांचे प्रा. देवदत्त पाठक यांनी मनापासून आभार मानले आहेत.

Related posts

२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’

editor

स्वातंत्र्यवीर सावरकरांची सावरकर प्रेमी मंडळाकडून १०४ वी जयंती उत्साहात साजरी

editor

आषाढी एकादशी यात्रेसाठी जादा अनुदानाची जिल्हाधिकार्यांची शासनाकडे मागणी

editor

Leave a Comment