Share
रत्नागिरी , ७ जुलाई :
रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. लांजा शहरात एसटी डेपोनजीक वहाळाचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर आले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील पुनस गावाला पावसाने झोडपून काढले आहे. नागरिकांना याचा फटका बसला आहे. ग्रामीण भागात ओढे,वहाळ पूर्णपणे प्रवाहित झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.